¡Sorpréndeme!

Sridevi मोठ्या पडद्यावर पाहण्याची अंतिम संधी | अखेरचा चित्रपट ऑक्टोबरमध्ये झळकणार | Lokmat Bollywood

2021-09-13 224 Dailymotion

मॉम हा श्रीदेवी यांच्या कारकीर्दीतला ३०० वा सिनेमा होता. श्रीदेवी यांच्या जिवंतपणी रीलिज झालेला तो अंतिम चित्रपट असला तरी प्रेक्षकांना श्रीदेवी यांना मोठ्या पडद्यावर पाहण्याची अखेरची संधी ऑक्टोबर महिन्यात मिळणार आहे. शाहरुख खान, अनुष्का शर्मा आणि कतरिना कैफ यांची मुख्य भूमिका असलेल्या 'झिरो' सिनेमात त्या झळकणार आहेत.झिरो सिनेमात श्रीदेवी यांचा कॅमिओ आहे, म्हणजेच त्या पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहेत. श्रीदेवी यामध्ये स्वतःचीच भूमिका साकारणार आहेत. झिरो चित्रपटातील एका फिल्मी पार्टी सीनमध्ये त्या दिसणार आहेत. या दृश्यात श्रीदेवीं सोबत करिश्मा कपूर, आलिया भट आणि शाहरुख खान दिसतील. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यातच या दृश्याचं चित्रीकरण झालं होतं.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews